RSS

Saturday, July 2, 2011

गंध फुलांचा गेला सांगुनी........!!!!!






    आज संध्याकाळी समुद्रावर फिरायला गेलो, जरा अडचणीच्या वाटेने जात होतो उगाचच दडपण आल्यासारखे झाले. समोर निळाशार मेरिडीयन समुद्र आणि लालसर पण तेजस्वी दिसणारा सा-या आसमंताचा निरोप घेणारा....सहस्त्ररश्मी....मावळतीचा हलकासा पिवळसर केशरी रंगाचा!!!! त्यामुळे समुद्राचं पाणीही लालसर केशरी दिसत होतं निसर्गाचं ते रूप डोळ्यात साठवत, अडचणीची वाट मग एकदम ओळखीची वाटायला लागली खूप दूरवर चालत गेलो आणि समोर गुलबक्षी रंगाच्या फुलांनी बहरलेले झाड दिसलं....  फुलं  खूप ओळखीची वाटली , सुगंध खोल खोल श्वासात  भरून घेतला डोळे बंद केले आणि डोळ्यासमोर माहेरच कौलारू घर आणि तिथल्या आठवणी त्या सुगंधा 
सारख्या फुलत गेल्या . 
    मी जळगावची, आमच्याकडे  भाद्रपद पौर्णिमे पासून अश्विन पौर्णिमे पर्यंत भुलाबाई बसवतात, म्हणजे 
शंकर पार्वती ची शाडूची मूर्ती आणि त्यांच्या सोबत त्यांच छोटसं बाळ, गणपती  विसर्जन झाले की त्याच्या 
दुस-या दिवाशी   आमचा दादा , आम्ही त्याला दादा कधीच म्हटले नाही ते अलाहिदा, मस्त बाहेरच्या 
खोलीतल्या कोनाड्यात छानसं डेकोरेशन करून द्यायचा पाठीमागे रंगीत  कागद लावायचा त्याच्यापुढे 
पांढरी चमकी लावलेले फिरणारे चक्र , मग शंकर पार्वतीची मूर्ती आणी त्याचं बाळ  तिथे विराजमान व्हायचं घरी  आल्या आल्या  दप्तर फेकायचे हातपाय धुवायचे  शाळेचा ड्रेस बदलायचा थोडंस काही खायचं आणि 
टिपर-या घेऊन जी धूम ठोकायची, मग लतु , सीमा, सुभी सायली, अंजू, मधू स्मिती, प्रतिमा सगळ्यांचा घरी
 भुलाबाईची गाणी म्हणायची "पाह्यली ग पूजा बाई देव देव साते .....पासून कारल्याच बी पेरलं ग सई, चांदीचा डेरा, सोन्याची रवी तेथे आमच्या सासूबाई  ताक करत होत्या ताक करत होत्या, सासूबाई सासूबाई मला मूळ आलं धाडता कां, अडकित जाऊ खिडकीत जाऊ, खिडकीत होता साबू भुलाबाई ला मुलगा झाला नांव ठेवा बाबू, सर्वात शेवटी  सगळ्यांच्या टिप-या एकमेकांवर उभ्या आडव्या ठेवून सर्वात वरती बाळ ठेवायचं तो पाळणा म्हणायचा,
डब्यात लपवलेला खाऊ ओळखायचा अगदी छोटासा खाऊ असायचा पण 
त्याचा विचार न करता मोठमोठ्याने गाणी म्हणत सगळ्या घरी फिरायचं, रात्री साडेआठ पर्यंत घरी परतायचं , जेवण करून थकून झोपी जायचं. घरचा गृहपाठ सकाळी लवकर उठून करायचा .

महिनाभर नुसते मंतरलेले दिवस अश्विन पौर्णिमेला रात्री  सगळ्या मैत्रिणीच्या भुलाबाईच्या  मूर्ती आणी त्याचे बाळ आमच्या मोठ्या वाड्यात छान आरास करून मांडायच्या आमची आई मोठ्या 
पातेल्यात जवळ जवळ ८-१० लिटरची बासुंदी अटवायाची, भेळ पण असायची, सगळ्या मैत्रीणीनी आपापले खाऊ आणलेले असायचे ते गुपित असायचे मग ते ओळखायचे, आमच्या सगळ्यांच्या आयांनी सांस्कृतिक कार्यक्रम बसवलेले असायचे नाच, नकला, गाणी नुसती धमाल असायची, मला आठवते मी आणि  सीमाने "देवावानी शेत माझं नवसाला पावलं, कुबेराच धन माझ्या शेतात गावलं" हे गाणं बसवलं होतं, मी मुलगा झाले होते , सातवीत असेल तेव्हा, आणि ते एवढ मोठं धोतर , त्याचा  पोंगा सावरता सावरता नाकी नऊ आले होते आणि धाकटा   संजू   किती तरी दिवस आमच्या नाचाची नक्कल करत होता ते वेगळेच....!!!!!

गुलबक्षीच्या सुगंधाने खूप साऱ्या आठवणी जागवल्या होत्या......ते कौलारू घर, ती शाळा, ती भुलाबाईची गाणी आणी खूप काही......!!!!!

गंध फुलांचा गेला सांगून..........!!!!!!! 

9 comments:

rohini gore said...

Dipti, aathvani tar chhan aahetach,shivay photo tar Excellent!!! aahet. khup mast vatle tula pahun. mala saglich phule aavadtat pan vishesh karun gulbaxi aani sadaphuli khup aavadate. Thanks. gulbaxi che dish madhle decoration tar wow! aahe.

दिप्ती जोशी said...

Thanks Rohini,

mala gulbaxi aani jai-jui phar aavadate.

Dipti

Shyam said...

चि.सौ.दीप्ती....
अतिशय सुंदर हृदयाला भिडणारे....
बालपणीचे आनंदाने न्हावुन निघालेले ....दिवस ...
आपोआपच त्या दिवसांचे वर्णन करतांना आध्यत्मिक बेस लाभतो....
कारण ह्या आठवणी आत्यंतिक आनंद देवुन जातात .......
आनंदी अन उस्फुर्त जीवन जगण्यास उद्युक्त करतात ........
खूप खूप छान ....असेच उत्तमोत्तम ....तू लिहिलेले लेखन
कधी वाचायला मिळते ह्याची वाट बघत असतो ...आम्ही सामान्य वाचक !!!

दिप्ती जोशी said...

shyam - tumacha pratisad khup usphurt asto, khup kahi shikavun jato, preranadayi asto...jaijuichya phulansarakha sagal vatavaran gandhit karun sodto - dipti

दिप्ती जोशी said...

shyam - aani ho samanya vachak naahi "rasik vachak" - dipti

Unknown said...

Kharach balpanicha to kaal khup sukh Acha. Me punela rahte gelya varshapasun me majhya chimuklisathi bhulabai basavite. Pan mala punyala bhulabaichi murti kuthech bhetli nahi. Mag majhya maaher kadun parcel yeto bhulabai cha. Kunakade address asel tar naķki mala dya.please. Kharach khup khup mazeche divas aathvun jatat.

Unknown said...

Kharach balpanicha to kaal khup sukh Acha. Me punela rahte gelya varshapasun me majhya chimuklisathi bhulabai basavite. Pan mala punyala bhulabaichi murti kuthech bhetli nahi. Mag majhya maaher kadun parcel yeto bhulabai cha. Kunakade address asel tar naķki mala dya.please. Kharach khup khup mazeche divas aathvun jatat.

Unknown said...

Kharach balpanicha to kaal khup sukh Acha. Me punela rahte gelya varshapasun me majhya chimuklisathi bhulabai basavite. Pan mala punyala bhulabaichi murti kuthech bhetli nahi. Mag majhya maaher kadun parcel yeto bhulabai cha. Kunakade address asel tar naķki mala dya.please. Kharach khup khup mazeche divas aathvun jatat.

दिप्ती जोशी said...

Thanks unknown. Mi aata nashikla aaste. Pan address milala tar nakki kalven. Yaach blog varchi shyamchi aajji hi katha pan vacha.aani tumcha abhipray kalva.

Post a Comment