गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे अल्जेरियातला सुट्टीचा दिवस. गुरुवारी सकाळी उठले. हॉलच्या काचेच्या तावदानातून बाहेर बघते तर काय....रस्ते...घरं....इमारती....झाडं....सगळं हरवलेलं. दुरवर पसरलेल्या धुसर धुक्यात. हे धुकं शेवरीच्या कापसाच्या म्हातारी सारखं सा-या आसमंतात हळूवार विहार करत होतं.
थंडी आणि दाट धुकं यात रोमान्स न सापडणारा आणि हातातली असतील नसतील ती कामं टाकून फिरायला न जाणारा विरळाच!! फ्रेश झालो आणि थंडीचा सगळा जामानिमा करुन बाहेर पडलो. दोन किलोमीटर चालत थेट मेरिडियन समुद्रापर्यंत पोहोचलो. गुलजारजींच्या "इस मोडसे जाते है कुछ सुस्त कदम रस्ते.....कुछ तेज कदम राहे....पत्थरकी हवेलीसे...शिशोंके घरोंदोतक" या गाण्यातून भेटणा-या अशा वाटांची आठवण करत धूक्यात हरवलेल्या वाटेने चालत होतो. किंचित ओलसर रस्ता!
झाडापानातून ठिबकणारे दवबिंदू.......मधूनच येणारी थंडीची शिरशिरी आणि अंगावर येणा-या धुक्याच्या लाटा.....आम्ही चालत होतो त्या वाटेवरच तेवढच दिसत होत...बाकी पाठीमागे आणि पुढे....सगळं धुसर....धुक्यात हरवलेल.
हे असं मागच आणि पुढचं दिसेनासं होणं हा अनोखा अनुभव होता. रस्ता परिचयाचा असला तरी परका वाटू लागला होता. नेहेमीची वळणं चकित करत होती. एरवी वेगाने धावणा-या गाड्या मिणमिणत्या उजेडात रस्ता शोधताहेत असं वाटत होतं. सा-या आसमंताला गुढ वातावरणाने झाकून टाकणारं हे धुकं काहीतरी सांगतय असं वाटत होतं....भुतकाळातल्या दु:खद आठवणींच्या खपल्या नकोत की भविष्यकाळातल स्वप्नरंजन नको...आत्ता जिथून चालतोय तो रस्ता.....!! तो ’वर्तमान’ तेवढा खरा...तो हातातून निसटू नको देऊस म्हणजे झालं!!
या धुक्यात चालता चालता उगीचच हरवल्यासारखं वाटायला लागल....अस्वस्थ वाटायला लागलं तोच आकाशात सुर्याचा उगवतीचा गोल दिसू लागला. त्या कोवळ्या किरणात सारं काही विरून गेलं. त्याक्षणी वाटलं की आपलं आयुष्यही धुक्यात हरवलेल्या वाटेसारखच आहे. जीवनाचं रहस्य आपण उलगडलय अस वाटत तोच संकटाच धुकं पसरतं, आपलं कोण परक कोण कळत नाही अपेक्षित वळणं
नागमोडी होतात. आपण भांबावून जातो....अशा वेळेस आपल्या मनातल्या आकाशात मैत्रीचा सूर्य उगवतो. कोणीतरी हातात हात घेउन म्हणतं "मी" आहे ना! हा "मी" इथे नेहेमीच भेटतो आपल्याला आणि संकटाच धुकं विरत!!! ते आपल्या मनातूनच आलेलं असत.
4 comments:
kiti mast lihile aahes ga dipti! chhan vatle vachun. photo pan mast aahet!
छोटासा च पण अतिशय सुंदर लेख.....काय वर्णु???
बरोबर तीस वर्ष-न-पूर्वी ज्या जोडीदाराच्या हातात हात देवून
सहजीवनाची सुरुवात केलीस....इतकं भरभरून आयुष्य जगलीस ....
त्याच जोडीदाराच्या साथीने जगातील हे सगळे...अत्युच्य आनंदाचे क्षण अनुभावतेस....
हृदयात साठवून ठेव.......
दीप्ती मला आता असे वाटते कि ..भूत काळातील दुख्ख्द आठवणी त्या मेरेडीअन समुद्रात सोडून
याव्यात.....अन अगदी फ्रेश अश्या ह्या आठवणी-न-चा साठवा व्हावा .....!!!!!
तू खूप अप्रतिम लिहितेस......आता घे उंच च उंच भरारी !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
dhanyavad rohini.
dipti
shyam,
tumachi pratikriya itakee sundar aste ki shabdaat vyakt karata yet naahi.
sagalya dukhad aathavani kadhich sodlyat meridian samudrat....!!!
dipti
Post a Comment