RSS

Wednesday, July 13, 2011

"फुलांची पायवाट"

फुलांमधली प्रसंन्नता आणि मुलांमधली निरागसता जीवनात आली की आयुष्याची पायवाट म्हणजे फुलांनी अंथरलेला गालिचाच होऊन जातो. मनुष्य कलेच्या प्रांतात वावरत असतो त्या क्षणी एक विशेष शक्ती कार्य करीत असते. हा निर्मितीचा क्षण म्हणजे आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण!!! त्या क्षणी "त्या" विशेष शक्तीचा "ईश्वरी-स्पर्श" अनुभवायला मिळतो.

१५ डिसेंबर २००९ ते १३ जानेवारी २०१० एखादा ध्यास लागल्या सारखा "फुलांची पायवाट" ही चित्र काढत होते. खुप मोठी चित्रकार आहे असे नाही, पण छंद म्हणून बघून बघून चित्र काढायला आवडतात. "जहांगिर आर्ट गॅलरीला" देवदत्त पाडेकरांच "द फ्लॉवरींग पाथ" च प्रदर्शन बघायला गेलो होतो, त्यांचं त्या प्रदर्शनाचं पुस्तक विकत घेतलं आणि त्यातली चित्र खुणावू लागली.....मग मंतरल्या सारखी चित्र कागदावर उमटायला लागलीत...या चित्रांमधली फुलं, निसर्ग, गोजिरवाणी मुलं सगळी माझ्याशी गोष्टी करायची. प्रत्येक चित्र पुर्ण झालं की पहिली काढलेली सगळी चित्र मांडून कितीतरी वेळ त्यांच्याकडे बघत बसायचे.... खरं तर नुसता छंद म्हणून ही चित्र काढलीत...ह्यांच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने अल्जेरियात रहाण्याचा योग आला आणि थोडासा स्वत:साठी वेळ मिळाला मग लिखाण, चित्र काढणे....खुप कांही गोष्टी हातुन घडायला लागल्या. ते क्षण खुप आनंद देऊन गेलेत .... निर्मितीचा क्षण...त्या क्षणी मन को-या पाटीसारखं असावं लागत .... निर्विचार .... निर्मल.....हळूवार !!!!

बाळाला जन्म देणारी "आई" अशीच असते का? खुप वेदनांना सामोरं जातांनाही तिच्या चेहे-यावर असिम आनंद असतो. गोंडस चेहेरा, छोटे छोटे हातपाय.... नाजुक जिवणी....!!! हा रक्तामांसाचा जीव माझ्या शरिरातून जन्माला आलाय....ही जाणिव सगळ्या वेदना विसरायला लावणारी. जगातला सर्वोच्च आनंदाचा क्षण!!!

या कागदावर रेखाटलेला निसर्ग, ही फुलं, ही गोजिरवाणी मुलं सगळी आपण काढलीत याचा विस्मयमिश्रीत आनंद !! खरोखर हा क्षण वर्णन करता येण्यासारखा नव्हता...!!! मग मनात विचार आला या छोट्याश्या कागदांवर रेखाटलेली ही निर्जिव फुलं, ही मुलं, हा निसर्ग बघून आपल्याला इतका आनंद होतो जी केवळ चित्रातली आहेत, सजीव नाहीत....मग सा-या चराचर सृष्टीला, निसर्गाला, मुलांना, फुलांना निर्माण करणारा "तो" जगत-नियंता, त्याला काय वाटत असेल? एवढं सगळं निर्माण करून तो मात्र "निराकार", "अव्यक्त" कुठेही दिसत नाही ... कसा असेल तो? त्याला बघण्यासाठी मन व्याकुळ होते ... मन त्या प्रभु पुढे नतमस्तक होते ... .मनात गाण्याच्या ओळी उमटतात ....

"ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है .....
हरी भरी वसुंधरापे निला निला ये गगन .....
ये जिसपे बादलोंकी पालकी उडा रहा पवन .....
दिशांए देखो रंगभरी चमक रही उमंगभरी .....
ये किसने फुल फुल पे किया सिंगार है ...."

         








 

8 comments:

davbindu said...

>>>फुलांमधली प्रसंन्नता आणि मुलांमधली निरागसता जीवनात आली की आयुष्याची पायवाट म्हणजे फुलांनी अंथरलेला गालिचाच होऊन जातो.

हे खूप खूप आवडल...

पोस्ट आणि ती चित्र छानच...!

दिप्ती जोशी said...

davbindu - dhanyavad. kharach aahe, pan ase hot naahi mhanun mag katyanchya vatene chalave lagte.

Shyam said...

हि निरागसता कायम जप .........!!!!!
कारण शेवटी अध्यात्माद्वारे जे काही साधायचे आहे ....
त्यात हि बालक होवून जगता येणे ....हेच तर साधायचे आहे न ?

दिप्ती जोशी said...

Dhanyavad Shyam.....hi niragasata aayushyat aanane hech mothe tap asave ase vatate.

rohini gore said...

लेख छानच! चित्र तर खूप सुंदर गं दिप्ती!! मला सर्वात पहिले चित्र जास्त आवडले. खूप खूप सुंदर चित्रकारी. अजूनही अशीच बघायला मिळोत.

दिप्ती जोशी said...

Thanks Rohini,

painting ha majha aavadata chhand aaahe, pan khup vel mila nahi tyala, pan nakkich ajun citra kaadhin.

Anonymous said...

tumhala ajun kay kay yeto ho Tai, Likhan, Painting... kay surekh rang, composition ani tyachya santhila shabda....... :)
ooops...mala tar comment sudhdha evadhi changali lihita yet nahi !! Khup khup surekha!!!
you are motivating !!

दिप्ती जोशी said...

Rajeshwari - Thanks. mala sagala aayushyach khup interesting vatate, pratyek kshanache sone karavese vatate, tyamule sakali uthalyapasun milalelya pratyek kshnach planning suru aste, majhya javal khup khajina aahe, pan ek mahatvachi gosta sangu....ya sagalya chhandatun mala tumachyasarkhe mitra maitrini milyalyat hi phar mothi achievement aahe ase mala vatate.

dipti.

Post a Comment